Home गडचिरोली काँग्रेस पक्षाचे डॉ. प्रमोद साळवे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षाचे डॉ. प्रमोद साळवे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

61

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच देसाईगंज (वडसा) येथील काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी व ॲड. संजय गुरू काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) दाखल झाल्यानंतर काँग्रेस पक्षातील डॉक्टर सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री तथा आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी देसाईगंज येथे त्यांनी पक्षप्रवेश केला.

डॉ. साळवे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून धानोरा तालुक्यासह जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी अनेक वर्षे काँग्रेसच्या डॉक्टर्स सेलचे राज्य सरचिटणीस म्हणून जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे़. मात्र काही अंतर्गत कारणांमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, देसाईगंज येथे ॲड. संजय गुरू यांच्या निवासस्थानी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सचिव नाना नाकाडे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, ज्येष्ठ नेते ॲड. संजय गुरू आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!