Home गडचिरोली आजाद समाज पार्टीच्या परिवारात दोन कार्यकर्त्यांचा प्रवेश

आजाद समाज पार्टीच्या परिवारात दोन कार्यकर्त्यांचा प्रवेश

62

– आजाद समाज पार्टीत नवीन ऊर्जेचा संचार ; धानोऱ्यात नवे तालुकाध्यक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा येथे आजाद समाज पार्टीच्या परिवारात दोन कार्यकर्त्यांचा उत्साही प्रवेश झाला. युवकांमध्ये लोकप्रिय असलेले किशोर उसेंडी व ग्रामपंचायत सदस्य वनिता केजू उसेंडी यांनी आजाद समाज पार्टीमध्ये प्रवेश करून समाज परिवर्तनाच्या वाटचालीत आपला सहभाग नोंदविला.

किशोर उसेंडी यांना धानोरा तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले असून वनिता केजू उसेंडी यांना युवक आघाडी तालुका अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. दोन्ही कार्यकर्ते हे सजग, उच्चशिक्षित आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य आणखी बळकट होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत येरकड – रांगी क्षेत्रातील तिन्ही जागांवर आजाद समाज पार्टी उमेदवार उभे करणार असल्याची माहिती प्रभारी हंसराज उराडे व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड व मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार उपस्थित होते.

error: Content is protected !!