– अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शिवसैनिक जिल्हा परिषदेवर धडकले
– समाज कल्याण विभागाचे विद्यार्थ्यांच्या प्रलंबीत शिष्यवृत्तीकडे वेधले लक्ष
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गोरगरीब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. परंतू चालू आर्थिक वर्षात शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. विद्यार्थ्यांसाठी निगडीत सदर गंभिर बाब लक्षात घेता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. उपमुख्यकाऱ्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन समस्या लक्षात आणून दिली. याप्रसंगी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आक्रमक पवित्रा घेत शासन व समाज कल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला.
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये विद्यार्थी टिकून राहावे यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. परंतू पात्र विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीचा लाभ मिळालेला नाही. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरूनही ती वेळेवर मिळत नसेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मनोबल कसे वाढणार, असा सवालही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी उपस्थित केला.

ग्रामीण भागातील विद्यार्थी हलाखीच्या परिस्थीतही शिक्षण घेत आहेत त्यांची आर्थिक परिस्थीती चांगली नाही त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. समाज कल्याण विभागाच्या योजनांमध्ये शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजनांचा समावेश आहे. ज्यामध्ये शिष्यवृत्ती ही आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी योजना आहे मौशीखांब. मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतू वर्ष लोटण्याच्या मार्गावर असतांना आणि दिवाळीचा सण आटोपून सुध्दा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आलेली नाही.विद्यार्थ्यांची दिवाळी अंधारात गेली.
गोरगरीब विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती व त्यांचे हित लक्षात घेता शिष्यवृत्ती वितरीत करण्यात यावी . शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती वितरीत न केल्यास जिल्हा परिषद समोर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरिंवदभाऊ कात्रटवार यांनी दिला.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते







