विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. धम्मदीप बोदेले आणि सागर निंबोरकर यांनी शेकडो युवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
गडचिरोली जिल्ह्यातील युवक, बुद्धिजीवी वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास, विकासाच्या राजकारणावरील निष्ठा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर असलेला विश्वासामुळे भाजपा कुटुंब दिवसेंदिवस बळकट होत आहे. यामुळेच सदर कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शहर महामंत्री अनिल कुनघाडकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







