विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली :
*मुलचेरा तहसील कार्यालयात निवेदन देताना सौ. रेखाताई डोळस महिला मोर्चा प्रदेश चिटणीस व शेकडो शेतकरी*
मुलचेरा तालुक्यातील
अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मुलचेरा तहसील कार्यालयात निवेदन सादर केले आहे. या निवेदनात, शेतकऱ्यांनी शासनाकडे प्रति हेक्टरी ₹२०,००० (वीस हजार रुपये) मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना झालेले मोठे आर्थिक नुकसान भरून काढता येईल.
पावसामुळे झालेल्या भातपिकाचा १००% शेतीचा सर्व्हे आवश्यक
यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, पावसाने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करताना कोणताही भेदभाव न करता १००% शेतीचा सर्व्हे करण्यात यावा.
अनेकदा वैयक्तिक पंचनामे व्यवस्थित होत नाहीत किंवा सरसकट पंचनाम्यामध्ये प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीपेक्षा खूप कमी मदत मिळते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले आहे की, त्यांचे हजारोंचे नुकसान झाले असताना त्यांना केवळ काही शेकडो रुपयांची मदत मिळाली आहे, जी अत्यंत अपुरी आहे.
आर्थिक मदतीची गरज
शेतकऱ्यांनी पीक घेण्यासाठी केलेला खर्च आणि झालेले उत्पन्न नुकसान पाहता, सरकारने तत्काळ हेक्टरी ₹२०,००० मदत जाहीर करावी, अशी सरसकट मागणी रेखाताई डोळस यांनी तहसीलदार साहेबाबाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तथा गडचिरोली चे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केली…. या वेळी सेकडोच्या संख्येने मुलचेरा तालुकतील शेतकरी तथा भाजपा पदाधिकारी jilla उपध्यक्ष्या प्रकाश भाऊ दत्ता ,प्रशांतजी कुत्तारमारे, तालुका अद्यक्ष संजू भाऊ सरकार,बादल जीं शहा, सुभाष जीं गणपती, निखिल जीं हलदार, उत्तम जीं शर्मा, प्रतिभा सरकार, निखिल वराटे, व भरपूर संख्येने शेतकरी, बूथ प्रमुख,कार्यकर्ते उपस्तिथ होते







