Home गडचिरोली ॲग्रो व्हिजन कार्यशाळा, कृषी प्रदर्शनी व संवाद कार्यक्रम

ॲग्रो व्हिजन कार्यशाळा, कृषी प्रदर्शनी व संवाद कार्यक्रम

44
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज स्थानिक कर्तव्य कक्ष क्रमांक 1 येथे भारतीय जनता किसान मोर्चा यांच्या वतीने ॲग्रो व्हिजन कार्यशाळा, कृषी प्रदर्शनी व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यशाळेत शेती क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रे आणि नव्या घडामोडी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शेती तज्ज्ञांशी थेट संवाद, शंकांचे निराकरण आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनाची संधी शेतकऱ्यांना मिळाली. कार्यशाळेत पर्यायी पिके, आधुनिक फळबागा तंत्रज्ञान, पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, कोरडवाहू शेतीसाठी यंत्रसामग्री व जोडधंदे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर्षी विशेष उपक्रम म्हणून अन्नप्रक्रिया उद्योग व शेतीत AI तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली असून, शेती क्षेत्रात नवे युग घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, भारतीय किसान संघ विभाग प्रमुख रामकृष्णाजी तामशेट्टीवार, किसान संघ जिल्हा प्रमुख उदयजी बोरावार, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विलासजी भांडेकर, तालुकाध्यक्ष दत्तूजी सूत्रपावर, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री मनमोहनजी बंडावार, पदाधिकारी व उपस्थित होते.

error: Content is protected !!