Home गडचिरोली माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली सिरोंचात पंचायत...

माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली सिरोंचात पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न

51
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पंचायत समिती सिरोंचा यांच्या वतीने वार्षिक आमसभेचे आयोजन शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी क्रीडा संकुलाच्या प्रांगणात करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी भूषवले.

याप्रसंगी सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम, तहसीलदार निलेश होनमोरे, गटविकास अधिकारी सुखीराम कस्तुरे, पत्रकार महेश तिवारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक निखिल फटिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कन्नाके, तालुका कृषी अधिकारी विकास, गटशिक्षणाधिकारी दोंतुलवार, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार, उपसभापती रिकाकूला कृष्णमूर्ती, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार तसेच आरडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बापन्ना रंगूवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमसभेत पंचायत समितीच्या वार्षिक कामकाजाचे विवरण सादर करण्यात आले. शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामविकास व शासकीय योजनांची अंमलबजावणी या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच नागरिकांच्या समस्या, मागण्या व सूचना यावर विचारविनिमय झाला. सभेला पंचायत समिती सदस्य, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!