Home गडचिरोली बुधवारपासून कारवाफा येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा

बुधवारपासून कारवाफा येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा

74

– आठ आश्रमशाळांचा सहभाग ; ५३३ खेळाडू दखविणार क्रीडा नैपुण्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बीटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन बुधवार, २४ सप्टेंबरपासून कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर सुरू होत आहे. यात कारवाफा बिटातील आठ आश्रम शाळेतील समारे ५३३ आदिवासी खेळाडू सहभाग घेऊन क्रीडा नैपुण्यतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करणार आहेत.

क्रीडा संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता सरपंच महानंदा आतला यांच्या हस्ते होणार आहे. सहउद्घाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल सिडाम उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एल. के. नरोटे, उपसरपंच विजय बहिरवार, जांभळीचे उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, पोलीस पाटील चित्रलेखा रायपुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, कारवाफा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा रंधये, डॉ. संतोष पुंगाटी, केंद्रप्रमुख संध्या मोंढे, मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्यासह बिटातील आश्रमशाळांचे मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत.

कारवाफा बीट स्पर्धेत कारवाफा, गडचिरोली, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा आठ आश्रमशाळांचा समावेश आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे. क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत, असे प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!