विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रामगड येथे गोवर व रुबेलाचे लसीकरण पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना गुरूवार,१८ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
गोवर हा विषाणूमुळे होणारा साथीचा आजार आहे. त्यामुळे बालकांना गोवर व रूबेलाचे दोन डोस दिले जातात. या दोन डोस दरम्यानचा ड्रॉप आऊट रेट झिरो करण्यासाठी आणि या आजाराचे संपूर्ण निर्मूलन साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये गोवर व रुबेला आजार प्रतिबंधक लसीकरण कार्यशाळा घेऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हे लसीकरण १५ ते ३० सप्टेंबर २०२५ या पंधरवड्यात सुरू आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पुराडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ.मेधा चवारे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहायिका विद्या ऊईके, अंडेल, दीपाली दमके, राहुल कापगते, परिचारिका अर्चना मडावी, धारा सहारे, सरिता सहारे, प्रतीक बोंडे, ताडाम, आशा वर्कर ज्ञानेश्वरी दखणे, मनीषा नैताम यांनी लसीकरण पूर्ण केले. लसीकरणासाठी मुख्याध्यापक के. एस. Adarsh, अधिक्षिका ढाकरे, वंदना केंद्रे, नयना बुरले, लुमेशा सोनेवाणे, काशिनाथ कुंडगीर, अनिल तिघरे, विनायक चिडे, प्रभू टेकाम, छगन सयाम, जमीर शेख व सर्व वर्गशिक्षकांनी सहकार्य केले.





