Home गडचिरोली धानोरा येथे भारतीय जनता पार्टीची विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न

धानोरा येथे भारतीय जनता पार्टीची विस्तारित कार्यकारिणीची बैठक संपन्न

57

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीतर्फे 16 सप्धाटेंबर रोजी धानोरा येथील आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील कर्तव्य कक्ष क्रमांक 3 येथे विस्तारित कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. ही बैठक दुपारी 3 वाजता घेण्यात आली.

या बैठकीस आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मधुकर भांडेकर, को-ऑपरेटिव्ह बँकेचे सचिव अनंत साळवे, तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, तालुका महामंत्री सुभाष धाईत, तालुका महामंत्री संतोष नमनुलवार, राकेश दास, सुभाष खोबरे, राकेश खरवडे, नगरसेवक अनिल मशाखेत्री, युवा मोर्चा अध्यक्ष सौरव सहारे, नरेश निमलवार, मुकुल बोडगेवार, घनश्याम मडावी, महिला आघाडी अध्यक्ष भूमाला परचाके, महादेव गणोरकर, दिलीप गावडे, बबलू मालाकार, गजानन परचाके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

बैठकीत संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुख्यत्वे मंडळ आढावा व अहवाल, सेवा सुशासन पंधरवाडा तसेच आत्मनिर्भर भारत कार्यशाळा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या व बूथ प्रमुख, व पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बैठक यशस्वीरीत्या पार पडली असून, आगामी काळात पक्षविस्तार आणि जनकल्याणकारी उपक्रम अधिक गतीमान करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!