Home गडचिरोली जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोडापे परिवार सरसावले क्षयग्रस्त बांधवांच्या मदतीला

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोडापे परिवार सरसावले क्षयग्रस्त बांधवांच्या मदतीला

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस भगवान बिरसा मुंडा यांना प्रेरणास्थानी ठेवून श्री फॉउंडेशनचे संस्थापक संचालक कोडापे परिवाराने धानोरा तालुक्यातील चव्हेला येथील 10 क्षयरोग उपचारीत रुग्णांना निक्षय मित्र प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान योजना अंतर्गत निक्षय मित्र म्हणून त्यांना दत्तक घेऊन सकस आहाराकरिता प्रोटीनयुक्त आहार वितरित करण्यात आले.

समाज बांधवांसोबत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास चव्हेला ग्रामपंचायतचे सरपंच अशोक बढाई, विशेषराव पोटी कोडापे (से. नि राखीव पोलीस निरीक्षक), जिजाबाई कोडापे (से. नि आरोग्य सेविका), बाबुराव आलाम (से. नि. पोलीस उपनिरीक्षक), वैभव सिडाम (सहा. अभियंता महावितरण) शीतल सिडाम, गोपिका शेडमाके, मंजुषा कोडापे, इंजि. पायल कोडापे, जेनिका कोडापे, सुमित आलाम, प्रकाश कोडापे, वेदांत घुमे, बेली शेडमाके, गिरीश लेनगुरे LTS, राखिम शहा (आरोग्य निरीक्षक), श्रीकांत कोडापे (आरोग्य सेवक), सदाशिव मंडावार (आरोग्य सेवक), आशा उर्मिला गावळे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!