विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली व्दारा संचालित अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा येथे आज, ११ ऑगस्टला लाॅयन्स क्लब गडचिरोली व आरोग्य केंद्र चांदाळा यांच्या वतीने सिकलसेल व आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी तर विशेष अतिथी म्हणून लाॅयन्स क्लबचे पदाधिकारी शांतीलाल सेता, शेमदेव चापले, क्लब अध्यक्ष महेश बोरेवार, उपाध्यक्ष किशोर चिलमवार, सचिव नितीन बट्टूवार, लॉ. सतीश पवार, लॉ. घनश्याम परशुरामकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियदर्शिनी कोडाप, डॉ. प्रियांका ढगे, आरोग्य सेवक दुधबळे, आरोग्य सेविका चांदाळा कुमरे, आशा वर्कर शालुबाई गेडाम, कल्पना डोंगरे, आशाताई मोहुरले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष महेश बोरेवार यांनी लाॅयन्स क्लबच्या कार्याची माहिती दिली. तर लाॅ. शांतीलाल सेता व लॉय. शेमदेव चापले यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले.
यावेळी 150 विद्यार्थ्यांची सिकलसेल, आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाॅयन्स क्लबचे अध्यक्ष महेश बोरेवार यांनी केले. संचालन सतीश पवार तर आभार सेलोकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळा चांदाळा येथील जगजीवन सेलोकर, सतीश पवार, विवेक आखाडे, अरविंद हर्षे, शोभा रामटेके, सोमेश्वर कलसार, मयुरी सहारे, सुभाष मडावी, भारती बांबोळे, शीतल कोहपरे, चांगदेव म्हशाखेत्री, मनोज सोमनकर, प्राथमिक आरोग्य केंद्राची चमु, तसेच आश्रमशाळा चांदाळा येथील सर्व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मित्र यांचे सहकार्य लाभले.







