Home गडचिरोली इंग्रजी आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

इंग्रजी आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

119

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येथील सेमाना बायपास मार्गावरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेत शनिवार, ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला सिडाम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार, प्रवीण दाभाडे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रोशन कुमरे, मुख्याध्यापिका वंदना महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांना विद्यार्थिनींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रभात फेरी काढून आदिवासी समाजाच्या विकासासाठी जनजागृती करण्यात आली. शालेय परिसर रांगोळीने सजविण्यात आले.रांगोळी स्पर्धा, राखी स्पर्धा, आदिवासी पारंपरिक नृत्य व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!