– शेतकऱ्यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे मानले आभार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, 7 ऑगस्ट : शेतीच्या कामाकरिता आवश्यक त्या प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने हस्तक्षेप करत 6 ऑगस्ट 2025 रोजी कालवा सल्लागार समितीच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेऊन कन्नमवार जलाशयातील पाण्याचा वापर करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सद्यस्थितीत कन्नमवार जलाशय 100 % भरलेले असून, 6.27 क्युमेक्स पाण्याचा साठा शेतीसाठी सोडण्यात आले.
त्याअनुषंगाने आज 7 ऑगस्ट रोजी सकाळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते जलाशय व यंत्रणांचे विधिवत पूजन करून जलाशयातील पाणी शेतकऱ्यांच्या वापरासाठी सोडण्यात आले. यावेळी त्यांनी जलाशय परिसरातील यंत्रणा, मशिनरी आणि व्यवस्थेची पाहणी केली.
पाण्याच्या सुरळीत उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, अनेक शेतकऱ्यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे विशेष आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे खरीप हंगामातील शेतीला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळणार आहे.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्करजी बुरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, घोट आष्टी मंडल अध्यक्ष राकेशजी सरकार, अनिलजी तिडके, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हा महामंत्री रेवनाथजी कुसराम, भाजपा तालुका महामंत्री संजयजी खेडेकर, शेषरावजी कोहळे, माजी जि. प. सदस्य नामदेवजी सोनटक्के, राजेंद्रजी चुधरी, भाविकजी आभारे, नीरजजी रामानुजनवार, विलासजी उईके, पाटबंधारे कार्यकारी अभियंता राहुलजी मोरघडे, घोट अभियंता विकासजी दुधबावरे, भेंडाळा अभियंता नोवेल डोंबले व सहकारी उपस्थित होते.





