Home गडचिरोली गडचिरोली येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर स्पर्धेकरिता 16 व 17 ऑगष्टला जिल्हा निवड चाचणी

गडचिरोली येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर स्पर्धेकरिता 16 व 17 ऑगष्टला जिल्हा निवड चाचणी

125

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने १४, १६, १८, २० वर्षाखालील मुले आणि मुलींकरिता राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या गडचिरोलीचा संघ निवडण्यासाठी गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 16 व 17 ऑगष्ट या कालावधीत एम. आय. डी. सी. मैदान कॉम्लेक्स गडचिरोली येथे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी 16 ऑगष्ट सकाळी 9 वाजतापासून लक्ष्यवेध अकॅडमी, गोंडवाना विद्यापीठ समोर, गडचिरोली येथे प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत धावणे, चालणे, लांब उडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक आदी क्रीडा प्रकाराचा समावेश असून स्पर्धेमधून प्रत्येक क्रीडा प्रकारातील २ विजयी महिला व पुरुष खेळाडूंची निवड राज्य संघटनेने दिलेल्या पात्रतेच्या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्याच्या संघात केली जाणार आहे.

स्पर्धेकरिता येताना खेळाडूंनी AFI ID क्रमांक (आवश्यक), जन्माचा दाखला, आधार कार्ड आणि रहिवासी दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता व अधिक महितीसाठी भ्रमणध्वनी 8999195070, 8275549514 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ॲथलेटिक्स सघंटनेचे सचिव आशिष नंदनवार यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!