Home गडचिरोली स्वर्गीय केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी साजरी

स्वर्गीय केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी साजरी

127

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वर्गीय केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची पुण्यतिथी आज, 6 ऑगस्टला महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने इंदिरा गांधी चौकातील विश्राम भवन येथे साजरी करण्यात आली. गडचिरोली जिल्हा महिला आघाडीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा योगिताताई प्रमोदजी पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रतिभाताई चौधरी, महिला आघाडी तालुकाध्यक्षnअर्चनाताई बोरकुटे, कविताताई उरकुडे, पुष्पा करकाडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, माजी नगरसेविका, वैष्णवीताई नैताम, नीताताई उंदीरवाडे, पुनम हेमके, संघमित्रा खोब्रागडे, ज्योती बागडे, मनीषा मळावी आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!