Home गडचिरोली कन्नमवार जलाशयाचे पाणी उद्यापासून सोडणार : आमदार डॉ. मिलिंद नरोटे

कन्नमवार जलाशयाचे पाणी उद्यापासून सोडणार : आमदार डॉ. मिलिंद नरोटे

61

– आमदारांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात सध्या रोवणीची कामे सुरू असताना समाधानकारक पावसाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे काम ठप्प होऊन त्यांच्यावर संकट ओढावले. त्यातच कन्नमवार जलाशयातून पाणी न सोडल्याने शेतकरी अधिक अडचणीत सापडले होते. ही परिस्थिती लक्षात घेत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी ४ ऑगस्ट रोजी कन्नमवार जलाशयाची पाहणी केली आणि तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

त्या पार्श्वभूमीवर आज विश्रामगृह येथे कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. मिलिंद नरोटे होते. यावेळी आमदार नरोटे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व जलाशयातील पाणी उद्यापासून (७ ऑगस्ट) सोडण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकाऱ्यांनी या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी करत उद्यापासून पाणी सोडण्यात येईल, असे सांगितले.

या बैठकीदरम्यान आमदार नरोटे यांनी जलाशयाशी संबंधित प्रलंबित कामेही लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी या कामांच्या नियमित पाहणीसाठी वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे, असेही सुचवले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्करजी बुरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष रोषणीताई वरघंटे, माणिकजी कोहळे, नीरजजी रामानुजनवार कविताजी किरमे, कार्यकारी अभियंता राहुल बोरघडे, घोट शाखा अभियंता दुधबावरे, भेंडाळा शाखा अभियंता डोंबळे, चामोर्शी शाखा अभियंता दुर्गे, तसेच विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!