विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शिवराजदादा मोरे व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा रविवार, 3 ऑगस्ट रोजी सेलिब्रेशन फंक्शन हॉल, चामोर्शी रोड गडचिरोली येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्ताने गडचिरोली शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली.
याप्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित राहून नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला व उपस्थित युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “देशाची खरी ताकद हा देशातील युवा वर्ग असतो. सध्याच्या काळात लोकशाही मूल्यांची मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असून ती टिकवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.”
या कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई मोहरकर, ज्येष्ठ नेते प्रकाश इटनकर, भातकुलवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अतुल मल्लेलवार, प्रदेश सचिव प्रतीक बारसिंगे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड यांच्यासह जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







