Home गडचिरोली राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने पुण्यवान सोरते सन्मानित

राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने पुण्यवान सोरते सन्मानित

54
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 6 किमी. अंतरावर असलेल्या साखरा ग्रामपंचायतीचे युवा सरपंच पुण्यवान सोरते यांना नुकतेच राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पंचायतराज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो. यंदा 29 जुलै रोजी लोणावळा येथील कार्यक्रमात इतिहासकार कोकाटे, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व वृक्ष देऊन पुण्यवान सोरते यांना सन्मानित करण्यात आले.

सरपंच पुण्यवान सोरते यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!