विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अहेरी विधानसभा मतदार क्षेत्रातील आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यातर्फे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा लोककल्याण फाउंडेशन आष्टीचे अध्यक्ष राहुलजी डांगे यांच्या मार्गदर्शनात 1ऑगस्ट 2025 रोजी सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टी येथील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलजी डांगे तर प्रमुख अतिथी म्हणून ममताताई डांगे, राखीताई मडावी, सरोजाताई बोंडे, मुख्याध्यापिका एस. डी. गलबले, शिक्षक एम. यु खोब्रागडे, चंद्रवैभव आत्राम, नितीन सेडमाके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आय .एम. शेरेकर यांनी तर.आभार प्रदर्शन सहायक शिक्षक पी. टी. वाकडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक बि. ए. क्षिरसागर, टी. एम. मल्लेलवार, के. आर. मसराम आदींनी सहकार्य केले.







