Home गडचिरोली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची गडचिरोली येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची गडचिरोली येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक

66
Oplus_16908288

– बैठकीला उपस्थित राहण्याचे इंजि. प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या विदर्भ दौऱ्याच्या अनुषंगाने गडचिरोली येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक सोमवार, 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्री संताजी भवन, सर्वोदय वॉर्ड, राणी दुर्गावती विद्यालयाजवळ, आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस, कोषाध्यक गजाननजी शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष पोपटराव गवडी, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष अतुल वांदिले, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला तैलिक महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!