Home गडचिरोली आगामी निवडणुकांमध्ये भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे : महेश केदारी

आगामी निवडणुकांमध्ये भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे : महेश केदारी

93

– शिवसेना (उबाठा) पक्षाची गडचिरोली विधानसभा क्षेत्राची बैठक संपन्न

– शिवसेना (उबाठा) पक्षात केला कार्यकर्त्यांनी प्रवेश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे. याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी आतापासून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांनी केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गडचिरोली विधानसभा क्षेत्राची बैठक सर्किट हाऊस गडचिरोली येथे जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या उपस्थितीत पार पडली, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, युवा विस्तारक शुभम सोरते, सहसंपर्कप्रमुख विजय शृंगारपवार, सल्लागार प्रा. राजेंद्र लांजेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील पोरेड्डीवार, संघटक नंदू कुमरे, शहर प्रमुख पप्पू शेख, युवासेना अधिकारी पवन गेडाम, महिला आघाडीचे भारती मडावी, स्मिता नैताम, आशिष मिश्रा, कुणाल कोवे, चेतन उरकुडे, गणेश झाडे, बादल मडावी, अतुल नैताम आदी उपस्थित होते.

यावेळी गडचिरोली शहरातील अनेक लोकांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी प्रशिक झाडे, ओमदीप भानारकर, जय सोवसीया, मंथन मने, साहिल पांचालवार, अभय संगेल, भैरव भानारकर, रोहित कोहपरे, अभिषेक मेश्राम, निरंजन गव्हारे, नितीन निंबोरकर, अजय बोकडे, सुलभ कावळे, गौतम खोब्रागडे, ओमप्रकाश कपाटे, रुचित चापले, शुभम बंडीवार, हर्ष मोहुर्ले, कृष्णा पदा यांनी पक्ष प्रवेश केला.

error: Content is protected !!