विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस 27 जुलै रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालय चामोर्शी रोड येथे साजरा करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य मिळावे हीच जगदंबे चरणी सर्व शिवसैनिकांनी प्रार्थना केली. सर्व पदाधिकारी व शिवसैनिक शिवसेना कार्यालयातून पैदल रॅली काढून महिला रुग्णालयात आले आणि डॉक्टर यांच्या उपस्थितीत सर्व रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, सहसंपर्कप्रमुख विजय शृंगारपवार, सल्लागार प्रा. राजेंद्र लांजेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा. सुनील पोरेड्डीवार, तालुकाप्रमुख घनश्याम कोलते, शहरप्रमुख पप्पू शेख, महिला आघाडीचे मंगलाताई बिरमवार, भारती मडावी, स्मिता नैताम, आशिष मिश्रा, सरपंच तुषार मडावी, प्रतीक झाडे, कृष्णा पदा, राहील शेख, विनय ब्राह्मणवाडे, रवींद्र निकोडे, मुकरू करकाडे, घनश्याम कावडे, दीपक कुमरे, रोशन निकुरे, विकास गंडाटे, मोनू कुमरे, हेमंत समर्थ, रत्नाकर सातपैसे, अनिकेत कुळमेते, प्रणय कोलते, अथर्व कुळमेते, वैभव समर्थ, चंद्रशेखर करकाडे, यश मंगर, दिनेश कुमरे, तुषार ब्राह्मणवाडे, कृष्णा निकुरे, वैभव कुमरे, विवेक ब्राह्मणवाडे, भूपेंद्र गंडाटे, तेजराम रायसिडाम, चंद्रदीप गेडाम, अनिल साळवे, अमन वाडेमवार, दिनेश दोनाडकर, प्रदीप राऊत यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवासेना व इतर शिवसैनिक हजर होते.







