Home गडचिरोली शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे शुक्रवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे शुक्रवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

73
Oplus_16908288

– आंदोलनात शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि युरिया व डीएपी खतांच्या होणाऱ्या तुटवड्याच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर उद्या, 18 जुलै रोजी दुपारी 3 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

पुरामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील पिके वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी उगम पातळीवरच बी- बियाणे कुजल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा स्थितीत शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, दुबार पेरणीसाठी शासन स्तरावर उत्तम दर्जाची बियाणे मोफत पुरवावी, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस बी – बियाण्यांचा सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास आले असून यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. अशा बियाणे विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळया यादीत टाकावे, युरिया व डीएपी खतांच्या तुटवड्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे तो दूर करण्यात यावा, खत विक्रेते लिंकिंग पद्धतीचा अवलंब करून खतासोबत इतर वस्तू खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत आहेत. या प्रकारांमुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याने ही पद्धत तत्काळ थांबविण्यात यावी, आदी मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर उद्या, 18 जुलै रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!