Home गडचिरोली पंडित विनोद बिहारी महाराजांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे गुरुपौर्णिमा उत्सव

पंडित विनोद बिहारी महाराजांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे गुरुपौर्णिमा उत्सव

76

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १७ जुलै : गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून १० जुलै २०२५ रोजी गडचिरोली येथील पोटेगाव मार्गावरील यमुना लॉन सभागृहात डोंगरगाव (छत्तीसगड) येथील पंडित विनोद बिहारी गोस्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते, खासदार डॉ. नामदेव किरसान, आ. विजय वडेट्टीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगीताताई भांडेकर, बिनाराणी देवराव होळी, श्रीमती नरोटे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, अविनाश महाजन, माजी नगरसेवक सतीश विधाते, प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, प्रकाश बारसागडे महिला मोर्चाच्या गडचिरोली तालुका अध्यक्ष अर्चना बोरकुटे, माजी नगरसेवक केशव निंबोड, विवेक बैस, अर्चना निंबोड, निताताई बैस, ज्योती बागडे, पुनम हेमके, दर्शिता प्रमोद पिपरे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमोद पिपरे, योगीताताई पिपरे व दर्शिता प्रमोद पिपरे तथा उपस्थित मान्यवरांनी पंडित विनोद बिहारी गोस्वामी महाराज यांचे स्वागत करून दर्शन घेतले व त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी बाहेर तालुक्यातून आलेल्या व गडचिरोली शहरातील नागरिकांनी महाराजांचे दर्शन घेतले व त्यांचा आशीर्वाद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली येथील गुरुदेव स्नेही मंडळ यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!