– माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन
– अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध उपक्रम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २९ मे : अहिल्याबाईंचे जीवन हे भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे. समाजसुधारणेच्या कार्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचा आदर्श महिलांनी घ्यावा व समाजात सुरू असलेल्या वाईट चालीरीती बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा व त्यांचे विचार व कार्याचा अंगीकार महिलांनी करावा, असे प्रतिपादन जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. सेमाना देवस्थान येथे आयोजीत कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गडचिरोली शहरात विविध प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा गडचिरोलीच्या वतीने आराध्य स्थान श्री क्षेत्र सेमाना देवस्थान परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान, जलाभिषेक कार्यक्रम, महाप्रसाद तसेच मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या कार्यक्रमास प्रामुख्याने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, डॉ. चंदाताई कोडवते, ज्येष्ठ नेत्या प्रतीभा चौधरी, माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्षा कविता उरकुडे,मंगेश रणदिवे, कलिम शेख, विवेक बैस, माजी नगरसेविका लताताई लाटकर, वैष्णवी नैताम, पुष्पा करकाडे, निता बैस, स्वाती चंदनखेडे, वर्षा कन्नाके, ज्योती बागडे, सोमेश्वर धकाते, देवाजी लाटकर, प्रा. अरूण उराडे, योगिता पतरंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर श्री. क्षेत्र सेमाना मंदिराच्या परिसरात मान्यवरांनी हातात झाडू घेऊन केरकचरा स्वच्छ केला तसेच मंदिरात जलाभिषेक व महापुजा सुद्धा केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिल्पकार शिल्पा भोयर यांनी अहिल्याबाईंची प्रतिमा साकारली त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नेत्या प्रतीभा चौधरी यांना ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेमाना देवस्थान चे पंडित यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान तथा विविध उपक्रम राबविण्यात आले त्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण मा.खा.डॉ. अशोकजी नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्यासह मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी, महिला, युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.