विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली शहरातील पंचवटीनगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य काल, 27 मे रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने श्रद्धा, संस्कृती आणि सेवा यांचा संगम साधणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच भव्य महाजलाभिषेक व महापूजा कार्यक्रम पार पडला.
यावेळी भाजपचे लोकसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे व जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी स्वच्छता अभियान अंतर्गत स्वतः हातात झाडू घेऊन मंदिर परिसर स्वच्छ केला व मंदिरात महापूजा केली. तसेच यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या हस्ते महाजलाभिषेक व महापूजा करण्यात आली. तद्नंतर प्रमोद पिपरे व योगिताताई पिपरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, विवेक बैस, निताताई बैस तसेच पंचवटी नगरातील नागरिक व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.