निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा

45

– सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी उपविभागातील पेरमिली व अहेरी येथे नवीन पुरणबांधणीचे काम सुरू असून कंत्रातदाराच्या चुकीच्या पध्दतीच्या पाईपलाईन खोदकामामुळे रस्त्याच्या बाजुला नाली खोदुन कसल्याही प्रकारची दबाई व रोलींग न केल्यामुळे जनतेला व शाळकरी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघाताची व जीवितहानी होण्याची शक्याता नाकारता येत नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

जलवाहिण्या सुध्दा अनेक जागी फोडल्यामुळे अहेरी, नागेपल्ली, आलापल्ली येथे पाणी पुरवठा पुर्णत: बंद झालेला आहे. पेरमिली येथे 39 कोटी रुपयाचे नवीन उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या बेसमेंटचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झालेले असल्यामुळे सदर काम दबत आहे. अहेरीमध्ये सुध्दा अंदाजीत 7 ते 9 कोटीचे रुपयाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे सुरू असून आतमधील काँक्रीट रस्त्याचे काम सलाखी योग्यरित्या न लावता व खाली 80 mm च बोल्डर सोलींग न करता निकृष्ठ दर्जाचे काम सुरू आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

लाईन लेथ 60 मिटर मध्ये करणे अनिवार्य असून कंत्राटदार पोल वाढविण्याकरिता 40 ते 30 मिटरमध्ये पोल टाकुन विभागाची व शासनाची दिशाभूल करीत आहे. पोल काँक्रीट 6 फुटपासून करणे अनिवार्य आहे. पण 1 ते दीड फीट काँक्रीट टाकुन टॉप मॉपींग करीत आहे. केबल लाईन अंदाजपत्रकानुसार न टाकता कमी टाकुन विभागाची व शासनाची दिशाभुल करीत आहे. सिमेंट रस्ता अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन विभागाची व शासनाची दिशाभुल करीत आहे. ट्रान्सफॉर्मर व बेसमेंट निकृष्ठ दर्जाचे असून विभागाची व शासनाची दिशाभूल करीत आहे. पोलला ब्लॉकबिटमोस आणी रेंड ऑक्साईट पेंट मारुन सिलव्हर पेंट मारणे अनिवार्य असताना कंत्राटदार सरसकट सिल्व्हर पेंट मारुन पोल लावत आहे. त्यामुळे पोल लवकर गंजुन खाली पडण्याची व जीवितहानी होण्याची शकत्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीची दखल घेऊन आपण आपल्या स्तरावरून चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी निवेदनातून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे निवेदनातून केली आहे.