Home गडचिरोली प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुणवंतांचा घरी जाऊन केला सत्कार

प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुणवंतांचा घरी जाऊन केला सत्कार

194

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी शुक्रवार, २३ मे रोजी सत्कार केला व यशस्वी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी रंजीत मडावी हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७८.२० टक्के गुण घेऊन यश प्राप्त केले. त्याचप्रमाणे याच आश्रम शाळेची सोनाली एकनाथ आत्राम हिने दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण घेऊन यश प्राप्त केले. या दोन्हीही विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन तसेच पालकांचा शाल व श्रीफळ देऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी सत्कार केला. सत्कार प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार उपस्थित होते.

यावेळी वैष्णवी मडावी हिने प्रथम एमबीबीएस डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आय. ए. एस. बनण्याचा मानस असल्याचे सांगितले. सोनाली आत्राम हिने डॉक्टर बनण्याचे स्वप्न असल्याचे यावेळी बोलून दाखविले.

error: Content is protected !!