Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

कारवाफा आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

131

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथे शुक्रवार, ११एप्रिल रोजी स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च माध्यमिक शिक्षक सी. डी. नळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, व्ही. एस. देसू, वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक व्ही. एम. नैताम, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, संगीता पुराम, संगणक शिक्षक स्वप्निल राठोड, क्रीडा शिक्षक अभय कांबळे, करिष्मा गोवर्धन, अधीक्षक गजानन सानप, योगेश उसेंडी, सुनिता देवावार, संगीता करंगामी आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी यांनी केले.

error: Content is protected !!