विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कन्हाळगाव येथे महिला ग्राम संघ कार्यालय व माता मंदिराचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, सह उद्घाटक म्हणून विलासजी बल्लमवार, सामाजिक कार्यकर्ते साईनाथजी कोडापे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आत्राम, पंचायत समिती सदस्य विनोदजी मडावी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कन्हाळगावातील सर्व ग्रामस्थांचे आणि महिला ग्राम संघाच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.







