Home गडचिरोली माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण कोठारी ज्वेलर्सच्या प्रदर्शनीचे उद्घाटन

माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण कोठारी ज्वेलर्सच्या प्रदर्शनीचे उद्घाटन

83

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : करण कोठारी ज्वेलर्स नागपूरच्या वतीने गडचिरोली येथील एस स्मार्ट मॉल येथे करण कोठारी ज्वेलर्सच्या प्रदर्शनीचे आयोजन 7 ते 9 मार्च 2025 पर्यन्त करण्यात आले आहे. शुक्रवार, 7 मार्च रोजी करण कोठारी ज्वेलर्सच्या प्रदर्शनीचे उद्घाटन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रतिभा रामटेके, मंगला सारडा, वर्षाताई कन्नाके, मंजू काबरा, दिलीपजी सारडा, नेहा सारडा, सरोज काबरा, प्रफुल सारडा, संगीता सारडा, शिखा काबरा, शालू भुसारी, पूजा सुरज शर्मा, पूनम सूचक, संगीता धाईत आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सांगितले की, नागपूर येथील करण कोठारी ज्वेलर्सचे संचालक गडचिरोली येथे प्रदर्शनी भरवून चांगल्या उच्च दर्जाचे दागिने व डायमंड गडचिरोली शहर वासियासाठी उपलब्ध करून दिले आहे. ही खरोखरच अभिनंदनीय बाब असून शहरातील महिलांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. सदर प्रदर्शनी दि 7 ते 9 मार्च 2025 पर्यन्त राहणार असून यात गोल्ड, डायमंड व जडाऊ ज्वेलरीची प्रदर्शनी ठेवण्यात आली आहे.

error: Content is protected !!