Home गडचिरोली जिल्हयाच्या विकासात डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे मोठे योगदान : रविंद्र वासेकर

जिल्हयाच्या विकासात डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे मोठे योगदान : रविंद्र वासेकर

118

– डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्ट नृत्य स्पर्धेचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हयातील आरोग्य क्षेत्रात डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजने सर्वप्रथम महाविद्यालय सुरू करून नर्सिंगच्या माध्यमातून ख-या अर्थाने महिला सक्षमीकरण केले. या माध्यमातून नर्सेसचा अनुशेष संपला असून आरोग्यक्षेत्र बळकट झाले आहे. या कॉलेजतर्फे दरवर्षी ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्ट व इतर कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात येत आहे. संथा चालविताना अनेक अडचणी येऊनही डॉ. प्रमोद साळवे यांनी या संस्थेचा व विद्यार्थिनींच्या विकासाचा वटवृक्ष उभारला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले.

स्टुडन्ट नर्सेस असोसिएशन डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजतर्फे शनिवार, १ मार्चपासून दोन दिवसीय ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्ट अंतर्गत एकल व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्र्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अविनाश भांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून यशोदा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राज देवकुले, चातगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अक्षय जाधव, डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, कोषाध्यक्ष डॉ. अमित रामने, माजी सरपंच नारायण सयाम, माजी सरपंच प्रतापशहा मडावी, माजी उपसरपंच पांडूरंग कुमरे, अंधश्रद्रधा निर्मूलन समिती चातगावचे अध्यक्ष विनायक सोरते आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश भांडेकर व उद्रघाटक रवींद्र वासेकर यांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे म्हणाले, गडचिरोली जिल्हा आदिवासी व दुर्गम असला तरी येथील महिला व मुली कौशल्याच्या बाबतीत इतरांपेक्षा कुठेही कमी नाहीत. त्यांना फक्त प्रोत्साहन व व्यासपीठाची गरज आहे. याच उद्रदेशातून डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये दरवर्षी ओपन टॅलेन्ट कॉन्टेस्टचे आयोजन केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नृत्य स्पर्धेचे परीक्षण इशा बैस व शुभांगी हलामी यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन निकिता सडमेक यांनी तर आभार प्रदर्शन श्रीशा अल्लूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सानु कोंडागोर्ला, सानिया सडमेक, शिल्पा गावडे, प्रशांत कोंडागोर्ला, नितीन अल्लूर, पियु्ष नंदेश्वर, वैशाली पिपरे, स्वाती नरोटे, इंदू चिपेली, सानिया बेडकी, श्रद्रधा कुनघाडकर, राखी मोगरकर, खोमेश बोभाटे, ताजीसा कोडाप, राज अल्लूर, आकांक्षा आखाडे, शुभांगी तुलावी, पूर्वीक्षी देशमुख, नंदीनी मेश्राम आदींनी सहकार्य केले.

error: Content is protected !!