Home गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागा

92
Oplus_131072

– भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

– वाघरे यांनी घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सदस्यता नोंदणी अभियानाचा आढावा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी, वडसा व कुरखेडा या तीन तालुक्यातील सदस्यता नोंदणी अभियानाचा आढावा घेतला व पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने भाजपा सदस्यता नोंदणी करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.

प्रशांत वाघरे यांनी पुढे बोलताना म्हणाले, स्थानिक संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण याआधी आपल्याला तयारी करायची आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण जिल्यातील नेत्यांना संधी दिली आता आम्हाला कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे.

गेल्या 3 वर्षात पक्षाच्या प्रत्येक पातळीवर कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. “मध्यरात्री जाहीर केलेलं आंदोलन सकाळी नऊ वाजता उठून कार्यकर्त्यांनी यशस्वी केलं, पक्षाने दिलेले कार्य व कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचवला”. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून कार्यकर्ता घराघरापर्यंत पोहोचण्याचा काम करीत आहे व याचा फायदा त्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये होणार त्याकरिता सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागण्याची आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

याप्रसंगी माजी आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष शालूताई दंडवते, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसेन, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, वडसा तालुकाध्यक्ष सुनील पारधी, भारत बावनथळे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, सुनील पारधी, सचिन खरकाडे, सचिन वानखेडे, पवन नारनवरे, सागर निरंकारी, योगेश नाकाडे, वसंता दोनाडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!