Home गडचिरोली पीएसआय जीवनदास शेंडे यांचा सेवापूर्ती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात

पीएसआय जीवनदास शेंडे यांचा सेवापूर्ती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात

100
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पोलिस उपनिरीक्षक (P. S. I.) जीवनदास एस. शेंडे यांचा सेवापूर्ती व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी प्रसन्ना सेलिब्रेशन हॉल नवेगाव, गडचिरोली येथे भूगोलशास्त्र मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. वासुदेव तडसे, मुख्याध्यापक पानघाटे (चंद्रपूर), सत्कारमूर्ती सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक जीवनदास शेंडे, अर्धांगिनी आशा जीवनदास शेंडे, माजी प्राचार्य अनिल आक्केवार, पोलिस कर्मचारी बरडे, सेवानिवृत्त शिक्षक वाय. के. निमगडे, अनिता निमगडे, बबिता तडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शांत व कर्त्यव्यनिष्ठ असे पोलिस उपनिरीक्षक जीवनदास शेंडे यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी ३४ वर्षांच्या पोलिस विभागातील सेवा काळात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व नक्षल प्रभावित भागात यशस्वीपणे कामगिरी बजावली आहे. अनेक अडचणींवर मात करीत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. असे कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी जीवनदास शेंडे यांचे पुढील आयुष्य निरोगी, आनंदीमय, सुखी, समाधानाने जावे, अशा शब्दांत शेंडे यांना उपस्थित मान्यवरांनी व मित्र मंडळींनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात भूगोलशास्त्र मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच मित्र मंडळी व मित्र परिवारांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला भूगोलशास्त्र मित्र मंडळाचे पदाधिकारी, मित्रमंडळी, मित्र परिवारातील सदस्य व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!