Home गडचिरोली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सरकार बसेल

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सरकार बसेल

86
Oplus_131072

– विरोधी पक्षनेने विजय वडेट्टीवार यांचा विश्वास

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे किमान १७५ ते १८० उमेदवार आणि विदर्भात ४५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येऊन महाविकास आघाडीचीच सरकार बसेल,  असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक चामोर्शी मार्गावरील सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.

राज्यात महायुती सरकारने बेरोजगारांना व शेतकऱ्यांना चांगलेच वाऱ्यावर सोडलेले आहे. हे सरकार आरक्षणविरोधी असून या निवडणुकीत जनता चांगलाच धडा शिकवेल. गृहमंत्री फडणवीस असलेल्या जिल्ह्यात सहा महिन्यात ३५३ महिलांवर अत्याचार होणे ही गंभीर बाब असल्याचे बोलून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार प्रहार करत चांगलाच समाचार घेतला.

या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह गडचिरोली – लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड. रामभाऊ मेश्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, प्रा.राजेश कात्रटवार, समशेरखा पठाण आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!