– शिवसैनिकांना मिठाई व भेटवस्तू देवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी वाटला प्रेमाचा गोड़वा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेनेचा जन्म संघर्षातून झाला आहे. हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी लढवय्या बाणा जोपासून शिवसेना निर्माण केली. मा. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक आहे. कितीही संकटे आली तरी कट्टर शिवसैनिक हा घाबरणारा नसून तो लढणारा आहे. संकटाचा सामना संघर्ष व एकजुटीने करा, असा मुलमंत्र मा. बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना दिला. मा. बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा व प्रेम कायम ठेवून मा. उध्दवसाहेब बाळसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद गावागावत बळकट करा, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
दीपावलीच्या पावन पर्वावर अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील “शिवसैनिकांचा स्नेहमिलनाचा सोहळा” अमिर्झा येथील ‘गुरूमठ’ या पावनस्थळी पार पडला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करतांना अरविंदभाऊ कात्रटवार बोलत होते. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार शिवसैनिकांना संबोधित करताना पुढे म्हणाले की, शिवसेना प्रमुख मा. बाळसाहेब ठाकरे यांनी ज्यांना मायेची ऊब दिली आणि मोठ्या पदापर्यंत पोहचविले. त्यांनी उध्दव ठाकरे साहेब यांच्याशी दगाबाजी करून आपला वेगळा संसार थाटला आहे. त्यांना राज्याच्या विकासाची व जनतेची काळजी नसून ते केवळ मोह, मायेत अकडले आहेत. यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आली नाही. शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव दिला जात नाही. शेतकरी अनेक संकटाचा सामना करीत आहे. परंतू संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्थैर्य देण्याचे काम राज्यातील सरकार करीत नसल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. आता आपल्याला नव्या दमाने उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निर्माण करायची आहे. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून वाटचाल करायची आहे.
यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, अमित बानबले, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुनघाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





