Home गडचिरोली जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आमदार गजबेंनी दाखल केला नामांकन अर्ज

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आमदार गजबेंनी दाखल केला नामांकन अर्ज

93
Oplus_131072

– आदर्श विद्यालयापासुन काढण्यात आलेल्या रॅलीला तुफान गर्दी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील दोन टर्म पासुन भाजपाचे आमदार असलेल्या कृष्णा गजबे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा विश्वास दर्शवून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. दरम्यान आमदार गजबेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथे नामांकन अर्ज दाखल केले.

Oplus_131072

शहराच्या आदर्श महाविद्यालयापासुन काढण्यात आलेल्या रॅलीत हजारोच्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आदी सहयोगी पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, नागरी सहकारी बँक गडचिरोलीचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, विधानसभा महायुती समन्वयक प्रमुख किसन नागदेवे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, कवाडे गटाचे मुकेश खोब्रागडे, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिवसेना जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अर्चना गोंदोळे, जिल्हाध्यक्ष अनु. जाती मोर्चा ऍड. उमेश वालादे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तलमले, युनुस शेख, संजय साळवे, ज़िल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नारायण धकाते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, सचिन खरकाटे, भाजपा महिला जिल्हा महामंत्री प्रिती शंभरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या रोशनी पारधी, तसेच सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि महायुती कार्यकर्ताच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले.

error: Content is protected !!