Home गडचिरोली महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी मंगळवारी मानांकन दाखल करणार

महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी मंगळवारी मानांकन दाखल करणार

85
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील पोरेटी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मा.मनोहर पाटील पोरेटी हे मा. ना. श्री. विजयभाऊ वड्डेटीवार विरोधी पक्षनेते, मा. श्री. डॉ. नामदेव किरसान खासदार, मा. श्री. मारोतराव कोवासे माजी खासदार, श्री. महेद्रभाऊ ब्राम्हणवाडे जिल्हा कांग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष गडचिरोली, महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे सगळे नेते, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत नामांकन दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्स येथून रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, सेल अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमेटी गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!