‘लाडकी बहिणींचा’ भव्य मेळावा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साधणार संवाद

30

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी बहिणींचा आज, 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाला गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यातील सर्व महिला भगिनी, सर्व महिला सरपंच, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी, ज्यांना लाभ मिळाला नाही अशांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. जे लाभार्थी वंचित राहिले त्यांचे फॉर्म भरून दिल्या जाणार आहेत. तसेच ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचाही पाठपुरावा घेणार आहेत. अनेक लाभार्थी लाडकी बहिणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आ. परिणय फुके उपस्थित राहणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, प्रदेश महिला आघाडी सदस्य रेखाताई डोळस, युवामोर्चा युवती प्रमुख पायल कोडापे यांनी दिली आहे.