Home गडचिरोली गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

91

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोलीचे संस्थापक तथा भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव गोवर्धनजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज, १८ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

आज रविवारी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे. तसेच ‘एक घास प्रेमाचा’ या उपक्रमाअंतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान करण्यात येणार आहे.

तसेच स्व. सुधाकरराव नाईक वि. जा. भ. ज. कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव येथे सायन्स लॅबचे उद्घाटन गोवर्धनजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर या महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!