Home गडचिरोली शेतकरी व महिलांचे सक्षमीकरण करून मध्यम वर्गाला दिलासा देणारा केंद्रीय अर्थसंकल्प :...

शेतकरी व महिलांचे सक्षमीकरण करून मध्यम वर्गाला दिलासा देणारा केंद्रीय अर्थसंकल्प : आ. गजबे

104

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज २३ जुलै २०२४ रोजी मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळातील गरीब, युवा, शेतकरी व महीलांचे सक्षमीकरण करणारा ३.० अर्थसंकल्प देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री मा. श्रीमती निर्मला सितारमन यांनी लोकसभेत सादर केला. हा केंद्रीय अर्थसंकल्प रोजगार, कौशल्य वाढ, सुक्ष्म, लघु मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देत शेतकरी व महिलांचे सक्षमीकरण करून मध्यम वर्गाला दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी दिली आहे.

या अर्थसंकल्पात देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण उपलब्ध करणे, कौशल्ययुक्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना चालना देऊन वाढ करणे, मुद्रा लोन उपलब्ध करणे, शिक्षणासाठी १०.०० लक्ष रुपयाचे शासन हमीवर शैक्षणिक कर्ज उपलब्ध करणे, शेतीच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या वाढ करणे, नैसर्गिक शेतीवर भर, शेतातील उत्पन्न वाढीसाठी संशोधनावर भर, भाजीपाला, अन्यधान्य विक्रीसाठी सप्लाय चेन उभारणे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा ४ अंतर्गत देशातील २५ हजार गावांना बारमाही रस्त्याने जोडणे, रस्ते, रेल्वे मार्गाचे सक्षमीकरण करत पायाभूत सुविधा उभारणे, सरंक्षण, अंतराळ यामध्ये देशाला आत्मनिर्भर करुन विकसीत भारताचा संकल्प पुर्ण करणे यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी केलेली असल्याचे आ. गजबे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!