महिला महाविद्यालयात रासेयोतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन साजरा

211

गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन घेण्यात आला. यावेळी ग्रंथालय प्रमुख डॉ. अनिल चहांंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण अभिवादन केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद बोधाने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश कृष्णाराव पाटील, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. शरयु गहेरवार, डॉ. कुंदन दुफारे, श्रीमती लता वाईलकर, सुनील दागमवार, मधु धानोरकार, पंकज धुडसे, मेघा मड़ावी व महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.