चामोर्शी येथील काँँग्रेसचे युवा नेते राहूल नैताम व कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

543

गडचिरोली : चामोर्शी नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष व काँँग्रेसचे युवा नेते राहूल नैताम व इतर युवा कार्यकर्त्यांनी ४ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनात पक्षाचा दुपट्टा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पवार साहेबांचे ध्येयधोरण सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यास कटिबद्ध राहणार. आ. धर्मरावबाबा आत्राम यांचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे उभा करून आगामी निवडणुकीत चामोर्शी नगरपंचायतवर झेंडा फडकविण्याचा निर्धार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली निरिक्षक श्रीकांत शिवणकर, युवक निरीक्षक जगदीश पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, बबलु हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, कपील बागडे, सूरज श्रीरामे, प्रसाद ताजणे आदी उपस्थित होते. राहुल नैताम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशामुळे चामोर्शी तालुक्यात व शहरात खऱ्याअर्थाने पक्ष वाढीस भक्कमपणे मजबूत होण्यासाठी मदत होणार, असा विश्वास आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.