अखेर गडचिरोलीत मेडिकल कॉलेजला मंजुरी

161

– आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठपुराव्याला यश

– आता जिल्हावासियांना मिळणार जिल्ह्यातच उत्तम वैद्यकीय सुविधा

गडचिरोली : मागील अनेक वर्षांपासून मेडीकल कॉलेजच्या मंजुरीसाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून गडचिरोली येथे मेडिकल कॉलेजला मंजुरी दिल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले आहे. गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजुर व्हावे याकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मेडीकल कॉलेजच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू झाली. आता राज्यातील आघाडी सरकारने त्या प्रयत्नांना पूर्ण रूप देत मेडीकल कॉलेजला मंजुरी दिली. याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना लहान लहान आजारांच्या उपचारासाठी चंद्रपूर- नागपूर येथील रुग्णालयात भरती करावे लागते. जिल्हयात मेडीकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यास अनेक गंभीर आजारांवरही जिल्ह्यातच उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांनी याबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असुन राज्यसरकारने मेडीकल कॉलेजला मंजुरी दिली आहे.