पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत होणार मेडीकल कॉलेज

150

– शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या मागणीला यश

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील तोकडी असलेली आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांनी जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने वैद्यकीय महाविद्यालयाची समस्या दूर झाली असून वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख यांनी गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावास तत्वत मंजूरी दिली आहे. तसेच आगामी शैक्षणिक सत्रापासून वैद्यकीय पदवीची पहिली बॅच सुरू करण्यासही सहमती दर्शवली आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले होते की, गडचिरोली जिल्हा अतिसंवेदनशिल व नक्षलग्रस्त असून जिल्हयाच्या दुर्गम भागात तर आरोग्यसेवेची बिकट स्थिती आहे. जिल्हयातील बाराही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गोरगरीब रूग्णांना योग्य तो औषधोपचार मिळत नाही. डॉक्टरांच्या रिक्त पदामुळे आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे. अनेक रूग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. जिल्हा अतिसंवेदनशिल असल्याने जिल्हयात तज्ञ डॉक्टर येण्यास धजावत नाही. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांची अनेेक पदे रिक्त आहेत. तालुक्यातील रूग्णालयात तज्ञ डॉक्टर नसल्याने रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो.

गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्हयासह सिमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील रूण उपचारासाठी येतात. रूग्णांची संख्या अधिक असल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रत्येक रूग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देणे अडचनीचे ठरत आहे. त्यामुळे गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे आणि आरोग्य सेवा बळकट करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. पालकमंत्री यांनी या मागणीची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली होती. या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन ना. अमित देशमुख यांनी गडचिरोलीत वैैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास तत्वता मंजूरी दिली आहे. गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.