शिवणी येथे काँग्रेसचे जनजागरण अभियान

120

गडचिरोली : तालुका काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या वतीने शिवणी येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागरण अभियान राबवून केंद्र सरकारने कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या महागाईचे निषेध करण्यात आले. यावेळी गावातून प्रभातफेरी काडून सभा घेन्यात आली. सामान्य जनतेला अच्छे दिनचे थोतांड स्वप्न दाखवून मोठे मोठे आश्वासन दाखवत केंद्रात भाजप सरकार सत्तेत आली. परंतु आज हे सरकार अर्थव्यवस्था हाताळण्यात पूर्णतः अपयशी झाली आहे आणि याचेच परिणाम सामान्य जनतेला महागाई च्या स्वरूपाने  सोसावे लागत आहे आज पेट्रोल, डिझेल, गॅससारख्या असंख्य जीवनावश्यक वस्तूच्या किंमती वाढवून केंद्र सरकारने सामान्य लोकांचे जगणे कठीण केले आहे. म्हणून येणाऱ्या निवडणूकात हीच सामान्य जनता या हुकूमशाही सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्वास जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी कार्यक्रमाला जि. प. सदस्य वैशाली ताटपल्लीवार, सरपंच किरण ताटपल्लीवार, उपसरपंच उषाताई गुरनुले, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, सचिव सुनील चडगुलवार, तालुुका काँग्रेस अध्यक्ष नेताजी गावतुरे, जितेंद्र मुनघाटे, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, नीलकंठ पेंदाम, खेमाजी निमगडे, परशुराम गेडाम, रमेश गेडाम, सुधीर बांबोळे, कमलेश खोब्रागडे, घनश्याम गुरनुले, मनोहर मडावी, नानाजी चुधरी, अरुना जुमनाके, श्रीहरी जुमनाके, मांजरूजी जराते, वसंत गेडाम, मनोहर गेडाम, योगाजी राऊत, अनेकेत राऊत, उषाताई गेडाम, कविता गेडाम, रंजना धारने आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी यावेळी उपस्थित होते.