काँग्रेस पक्षाची विचारधारा गावागावात पोहचवून निवडणुकीसाठी जिद्दीने कामाला लागा : महेंद्र ब्राह्मणवाडे

92

– पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात वडधा येथे जनजागरण अभियान

गडचिरोली : काँग्रेस पक्षाची विचारधारा गावागावात पोहचवून येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने कामाला लागावे, असेे आवाहन काँँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. 20 नोव्हेंबरला आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जनजागरण अभियान राबवून सभेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, तेजस मडावी,  जि. प. सदस्य वनिता सहाकाटे, मिलिंद खोब्रागडे, आरमोरी शहर अध्यक्ष शालिक पत्रे, कृष्णा झंझाड , दिलीप घोडाम, नंदू खान्देशकर, श्रीकांत काथोडे, रामभाऊ नन्नावरे, माजी सरपंच अर्चना कोलते, देलोडा सरपंच डंभाजी हुलके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  यावेळी पुढे बोलताना ब्राह्मणवाडे म्हणाले, भाजपा सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून सर्वसामान्य जनता महागाईमुळे कंटाळली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केंद्र शासनाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये  काँग्रेसच्य कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागून काँग्रेसची सत्ता येणे काळाची गरज आहे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी सर्वप्रथम वडधा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून वडधा  येथील मुख्य रस्त्याने जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली. त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला जीवन कोलते, अरविंद फटाले, माजी सरपंच अर्चना कोलते, शालू कोलते, प्रतीक खेवले, केवलराम गेडाम, देवराव कोडाप, ऋषी मानकर, शरद कोडाप, दिवाकर भरडकर, कानू भोयर, केवलराम नागोसे, प्रभाकर गेडाम, विकास शेडमाके, देविदास उंदीरवाडे, राजू कावळे, पुंडलिक ठाकरे, राजू कोडापे, संतोष लाकडे, श्रीकांत भजभुजे, तसेच परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माजी उपसरपंच विश्वेश्वर दरो, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रा. पं. सदस्य  व तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भूपेश कोलते यांनी केले.