चांंभार्डा येथे ‘सैराट कन्हैया लावणी व डान्स’चे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन

101

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील चांंभार्डा येथे कला मंडळ चांंभार्डा यांच्या सौजन्याने “सैराट कन्हैया लावणी व डान्स”चे आयोजन केलेले होते. या लावणी व डान्सचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनीय भाषणात ते म्हणाले, वर्षभर शेतकरी शेतात राबतो. शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणुन आज चाभार्डा येथे कला मंडळ चांंभार्डा यांच्या सौजन्याने “सैराट कन्हैया लावणी व डान्स” चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गवकारी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे ते बोलताना म्हणाले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले शिवसेना उपतालुका यादवजी लोहंबरे, अम्बादे, संदीप भुरसे, कोटांंगले, कला मंडळ चांंभार्डा येथील संदीप अलबंनकर, सुरेश कोलते, लोमेश उरकुड़े, मयूर भोयर, कुशाल मेश्राम, प्रदीप चपले, पप्पू फुकेट, भक्तदास झरकर, विनायक लाजुरकर, गावकारी मंडळी मोठ्या संख्याने उपस्थित होते.