बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून समाजसेवेचा वसा अविरत जोपासणार : अरविंदभाऊ कात्रटवार

131

– शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गिलगाव (बाजार) येथे शेकडो माता- भगिनींना वस्त्रदान

गडचिरोली : हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासून शिवसेना निर्माण केली. तळागळातील गोर – गरिब जनतेला केंद्रबिंदु मानून समाजसेवेची शिकवण दिली. मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना दिलेली शिकवण व त्यांचा आदर्श जोपासून एक कट्टर शिवसैनिक म्हणून माझ्या हातून जनसेवेचे कार्य अविरत सुरु राहणार, असे प्रतिपादन शिवसेना गडचिरोली उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील गिलगाव (बाजार) येथे गोर – गरीब महिलांसाठी वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी व्हिडीओ कॉलव्दारे मुंबईवरुन कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवन मार्गदर्शन करताना म्हणाले, जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहावे. जनता व शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मा. शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या रुपात शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहण्याचे भाग्य राज्यातील जनतेला लाभले आहे. मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वातील सरकार गोर – गरिबांच्या कल्याणाचे काम करीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला आधार दिला जात आहे. शिवसेना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असून जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहून शिवसेनेची ताकद वाढवावी, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांनी केले. यावेळी शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी बगमारे म्हणाले की, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार हे जनतेच्या हाकेला धावून जाणारे खरेखुरे शिवसैनिक आहेत. कोणतीही समस्या त्यांच्यापर्यंत पोहचविल्यास जनतेला न्याय मिळवून देतात. वाढत्या महागाईच्या काळात गोर – गरीब जनतेचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत अरविंदभाऊ कात्रटवार यांनी गोर – गरीब महिलांना वस्त्रदान करुन सामाजीक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या हातून सत्कार्य असेच घडत राहावे आणि जनता नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील, असे ते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे म्हणाले की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेसाठी शिवसेनेची उभारणी केली. शिवसेनेने समाजकारणावर अधिक भर देऊन जनतेशी नाळ जोडली. मा. बाळासाहेबांचा आदर्श जोपासुन शिवसेनेचे जनसेवेचे कार्य सुरु असूून शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आयोजित केलेला वस्त्रदानाचा उपक्रम त्यांचे ज्वलंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वरजी बगमारे, राजूभाऊ कावळे उपजिल्हा प्रमुख, उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, गिलगाव शाखा प्रमुख प्रशांत ठाकरे, राहुल सोरते, निकेश लोहंबरे, स्वप्निल खांडरे, सुरज आकरे, काळबांधे, मेश्राम साहेब, रामदास हर्षे, रुषीजी आवारी, हरीदास हर्षे, दिवाकर कोटांगले, रमेश आवारी, प्रशांत ठाकुर, तुषार बोरकर, भैय्या फुलझले, हर्षल रामटेके, जयंत मेश्राम, विकास कोसमशिले, प्रविण आवारी, हंसराज लडके, अजय भरणे, वसंत नगराळे, तुषार बोरकर, साईनाथ कोडाप, हिरालाल हर्षे, वामन भरणे, आकाश गेडाम, गौरव हर्षे, कुमदेव आवारी, हरिदास रामटेके, मुकेश चौधरी, कवडु खेडेकार, सचिन भरणे, मुखरु खोब्रागडे, अनिल कोसमशिले यासह गिलगाव येथील शेकडो माता – भगिनी, गावकरी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.